Pune : माऊलींच्या मार्गावरील दिवेघाट दुर्गंधीच्या विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : माऊलींच्या मार्गावरील दिवेघाट दुर्गंधीच्या विळख्यात

उंड्री : सासवड (श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी) महामार्गावरील दिवेघाट दुर्गंधीच्या विळख्यात अडकला आहे. कचऱ्याचे ढीगाऱ्यामध्ये रक्त-लघवीचे नमुने तपासणीसाठी वापरलेल्या केंटेनर, बाटल्या, रक्ताने माखलेले सीरिंजचा वन्यजीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने कचरऱ्याची स्वच्छता करावी, अशी मागणी पर्यटकांकडून होऊ लागली आहे.

दिवेघाट की कचराकुंडी असा प्रश्न पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे. घाटातील वळणावर पोल्ट्री, खराब झालेली फळे, तरकारी, हॉटेलमधील कचरा, मेलेल्या कोंबड्या, अंडी, नासलेली फळे, प्लास्टिक पिसव्या, मृत जनावरे, मुदतबाह्य औषधे, सीरिंज,, इंजेक्शन, रक्त-लघवीसाठी लागणारे सॅम्पल, वापरलेल्या सीरिंज बाटल्या, हॉटेलमधील शिल्लक अन्न, दारूच्या बाटल्यांचा खच साचला असून, त्याच्या कुजट वासाने दिवे घाट स्वागत करतो आहे की, काय असा सवाल पर्यटकांनी उपस्थित केला आहे.

दिवेघाटातील तुटलेल्या कठड्यावरून कचरा फेकला जातो. कचरा टाकणाऱ्यावर प्रशासनाने गुन्हे दाखल करीत त्यांच्याकडून स्वच्छता करून घ्यावी. दिवेघाटातील कचरा स्वच्छ करून कचरामुक्त दिवेघाट अशी ओळख निर्माण करावी, कठडे दुरुस्त करावेत, लोखंडी रेलिंग बसवून सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक शाबाद मुलानी, संदीप मोडक, सागर मोडक यांनी केली आहे.

दिवेघाटातील ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे वर्षा विहारासाठी पर्यटकांची शनिवार-रविवारी मोठी गर्दी होत आहे. हिरवागार शालू नेसलेला दिवेघाट, मंजूर आवाजाचे वाहत्या पाण्याचे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढत असून इतिहासात दिवेघाट मस्तानी तलावाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

- डॉ. अनिल पाटील, पर्यटक

दिवेघाटावरील २५ फुट उंच विठ्ठलाची मूर्ती आणि मस्तानी तलाव सर्वांसाठीच सेल्फी पॉइंट बनले आहेत. मात्र, या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

- अमोल भिंगारे, पर्यटक

दरम्यान, महामार्ग विभागाचे तंत्रज्ञ अनिल गोरड यांच्याशी दिवेघाटातील कचरा समस्येविषयी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Pune Diveghat Mauli Route Thick Of Stench

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..