मामा-भाचीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

divorse

आवडीनिवडीमधील फरक आणि वैचारिक मतभेद झाल्याने आठ वर्षे संसार केल्यानंतर मामा भाचीने एकमेकांपासून घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

मामा-भाचीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

पुणे - आवडीनिवडीमधील फरक आणि वैचारिक मतभेद झाल्याने आठ वर्षे संसार केल्यानंतर मामा भाचीने एकमेकांपासून घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. हे जोडपं नात्याने मामा भाची आहे. नातेवाईकांच्या आग्रहामुळे भाचीने मामाचा पती म्हणून स्विकार करत लग्न केले. त्यांना सहा वर्षाची मुलगीही आहे.

तेजस (वय 35) आणि रुपाली (वय 28) (नावे बदललेली) असे या पती-पत्नीचे नाव. लग्नापूर्वी तेजस हा कात्रजला तर रुपाली धनकवडीला राहत. त्यांचे तीन मे 2014 रोजी लग्न झाले होते. त्यांना आर्या नावाची मुलगी असून ती सहा वर्षांची आहे.

लग्नानंतर सहा वर्ष त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र गेल्या दोन-अडीच वर्षांत त्यांच्या विचारामध्ये खूप तफावत निर्माण झाली. त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्याने त्यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातून त्यांच्यात अनेकदा वाद देखील झाले. वाद अगदी टोकाला गेल्याने आणि भविष्यातही एकत्र येण्याची शक्यता नसल्याने हे तीन जानेवारी 2020 पासून विभक्त राहू लागले आहेत. त्यानंतर त्यांनी अ‍ॅड. अजिंक्य गायकवाड यांमार्फत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

पत्नीला नको पोटगी आणि पत्नीला नको मुलीची भेट -

घटस्फोटानंतर रुपालीने पतीकडून पोटगी न घेण्याचे मान्य केले आहे. तर मुलीचा ताबा हा रुपालीकडेच राहिल. घटस्फोटानंतर तेजस मुलीला भेटता येणार नाही, या अटी अर्जात आहे. त्या दोघांनी मंजूर केल्या आहेत.

घटस्फोटाच्या अर्जात आहेत या अटी -

- पत्नीला पोटगीची मागणी करता येणार नाही

- लग्नात मिळालेल्या वस्तू पतीने परत कराव्यात

- एकमेकांविरुध्द तसेच एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरुध्द भविष्यात कुठलेही दावे दाखल करणार नाही

- स्थावर अथवा जंगम मालमत्तेवर हक्क सांगणार नाही

- न्यायालयाच्या आदेशानंतर दोघेही दुसरा विवाह करू शकता

हे जोडपं गेल्या दोन-अडीच वर्षांपासून विभक्त राहत आहेत. त्यांच्यातील वाद संपावेत म्हणून त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराने मध्यस्थी केली. मात्र त्यांच्यातील वाद मिटले नाहीत. पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसल्याने दोघांनी परस्परसंमतीने न्यायालयात अर्ज केला आहे.

- अ‍ॅड. अजिंक्य गायकवाड, रुपाली व तेजसचे वकील

Web Title: Pune Divorce Court Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecrimeDivorceCourt
go to top