
Preventing the Flames of Negligence: Pune Fire Brigade Pushes 'Cracker Safety' for Diwali.
Sakal
पुणे : दिवाळीच्या उत्सवात निष्काळजीपणामुळे आगीसारख्या भीषण घटना घडतात. मागील चार वर्षांत फटाक्यांशी संबंधित आगीच्या घटनांत वाढ झाली असून, गतवर्षी २०२४ मध्ये आगीच्या ६० घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलाने यंदा ‘फटाके सुरक्षा जनजागृती मोहीम’ हाती घेतली आहे.