

FDA officials inspect and seize 20,085 litres of edible oil worth Rs 50.27 lakh from a D-Mart storage facility in Ambi village, Maval, Pune district. Nine samples have been sent for laboratory testing
esakal
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या डी-मार्टच्या गोदामावर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. मावळमधील आंबी गावात असलेल्या अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या (डी-मार्ट) सुविधेची तपासणी करताना अधिकाऱ्यांनी तब्बल २० हजार ८५ लिटर खाद्यतेल जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या तेलाची एकूण किंमत ५० लाख २७ हजार ८९३ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. खाद्यतेलाचा दर्जा निकृष्ट असण्याची तसेच उत्पादनांवर दिशाभूल करणारी लेबले लावण्यात आल्याची शंका असल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झालेला नसल्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचे अद्याप निश्चित झालेले नाही.