देणाऱ्यांना सहकार्य, घेणाऱ्यांना मदत! विद्यार्थ्यांसाठी ‘पुणे डोनेट हँड ॲप’ विकसित

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून अधिकारी बनायचे आणि घरातील व समाजातील गरिबी हलकी करण्यासाठी काम करायचंय. पण माझी आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे.
Pune Donate Hand App
Pune Donate Hand AppSakal

पुणे - स्पर्धा परीक्षांचा (Competitive Exam) अभ्यास करून अधिकारी बनायचे आणि घरातील व समाजातील गरिबी (Poor) हलकी करण्यासाठी काम करायचंय. पण माझी आर्थिक परिस्थिती (Economic Condition) खूपच हलाखीची आहे. त्यातच कोरोनामुळे (Corona) दोन वेळचं पोट भरणे मुश्कील होऊन बसले आहे. परिणामी मला सध्या स्पर्धा परीक्षांची पुस्तके खरेदी (Book Purchasing) करता येत नाहीत. जुनी का असेना पण सध्या ही पुस्तके मिळणे गरजेचे आहे. ती मला उपलब्ध झाली तर, माझी गरज भागेल. शिवाय अधिकारी बनण्याचं स्वप्न पुढे नेण्यासाठी प्रयत्न करता येतील. ही मागणी नव्हे तर, नंदूरबार जिल्ह्यातील कल्पेश शिंदे या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने मांडलेली व्यथा आहे. पुणे शहरातील काही युवकांनी एकत्र येत, गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी ‘पुणे डोनेट हँड ॲप’ (Pune Donate hand App) विकसित केले आहे. हे ॲप रविवारपासून (ता. २१) कार्यान्वित झाले आहे. शहरातील प्रवीण महाजन, सचिन म्हसे, मयूर बागूल, समाधान पाटील, तुषार पाटील या पाच युवकांनी मिळून हे ॲप कार्यान्वित केले आहे. या ॲपवर कल्पेश शिंदे या विद्यार्थ्यांने त्याची ही व्यथा मांडली आहे. (Pune Donate Hand App Develop by Student Initiative Help)

अशी आहे सेवा

  • दानशूर आणि गरजू व्यक्तींसाठी सेवा मोफत उपलब्ध

  • हे ॲप गुगल प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध

  • याच्या माध्यमातून दानशूर पुणेकर घरबसल्या गरीब व गरजू विद्यार्थी, व्यक्तींना मदतीचा हात देऊ शकणार

  • पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक वाचलेली व वापरलेली पुस्तके, जुने फर्निचर, मोबाईल, संगणक, लॅपटॉप किंवा सायकली आदी वस्तू गरजूंना भेट देऊ शकतील

Pune Donate Hand App
लर्निंग लायसन्सच्या परीक्षेचा व्हिडिओ मराठीतही येणार

अशी सुचली ॲपची संकल्पना

लातूर जिल्ह्यातील एका गरीब विद्यार्थ्यांने ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध न झाल्याने आत्महत्या केल्याची बातमी वाचली. इकडे माझ्या अनेक मित्रांकडे जुने मोबाईल असल्याने व ते अशा गरीब विद्यार्थ्यांना दान करू इच्छित होते. पण अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेणे जिकिरीचे झाले होते. या घटनेच्या माध्यमातून वस्तू दान देणारे नागरिक आणि वस्तूंची गरज असलेले व्यक्ती यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या ॲपची संकल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात आणल्याचे प्रवीण महाजन यांनी सांगितले.

हे लक्षात ठेवा

  • पुणे शहरातील व्यक्तींनी त्यांच्या वापरलेल्या जुन्या वस्तू, पुस्तके फेकून न देता त्या गरजू व्यक्तींना वापरण्यासाठी मिळाव्यात, या उद्देशाने हे ॲप विकसित केले आहे

  • यामुळे पुणेकर या ॲपच्या माध्यमातून आपापल्या जुन्या वस्तू किंवा पुस्तके गरजूंना भेट देऊ शकतील

  • ज्या गरजूंना पुस्तके किंवा एका वस्तूची गरज आहे, असे विद्यार्थी, व्यक्तीही याच्या माध्यमातून हव्या असलेल्या वस्तूंची मागणी नोंदवू शकतील

माझ्याकडील जुनी सायकल गरजू विद्यार्थ्याला देऊ इच्छित होतो. पण त्याचा शोधायचा कसा, हा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, पुणे डोनेट हँड ॲपमुळे हा प्रश्‍न सुटला आहे. म्हणूनच याबाबतची नोंदणी ॲपवर केली आहे.

- दुर्गेश भडांगे, पाषाण, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com