लर्निंग लायसन्सच्या परीक्षेचा व्हिडिओ मराठीतही येणार

लर्निंग लायसन्सच्या परीक्षेचा व्हिडिओ मराठीतही येणार

पुणे ः लर्निग लायसन्सच्या ऑनलाईन परीक्षेसाठीचा मराठी भाषेतील व्हिडिओ लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटरद्वारे बुधवारी दिली. ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेऊन पाटील परिवहन खाते या बाबत करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

नागरिकांना घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळावे, व्यवहारात अधिक पारदर्शकता यावी आणि एकूणच कार्यप्रणाली अधिक सोपी व्हावी, या उद्देशाने परिवहन खात्याने पुढाकार घेऊन परिवहन संकेतस्थळावर 'ऑनलाईन' परीक्षा आणि कार्यप्रणाली १४ जूनपासून सुरु केली आहे. मात्र, त्यात उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी रस्ता सुरक्षा नियमांचा समावेश असलेला व्हिडिओ पाहणे आणि एकणे बंधनकारक आहे. हा व्हिडिओ इंग्रजी आणि हिंदी भाषेतच सध्या उपलब्ध आहे. राज्यात सुमारे ९५ टक्के मराठी उमेदवार लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा देतात. त्यात ग्रामीण भागातील युवकांचाही समावेश आहे. इंग्रजी भाषेतील व्हिडिओ सुमारे १२ तर हिंदी भाषेतील व्हिडिओ सुमारे ८ मिनिटांचा आहे. मात्र, हा व्हिडिओ मराठी भाषेत नसल्यामुळे अनेक युवकांचा हिरमोड होत असून त्यांना नाईलाजाने एजंटांची मदत घ्यावी लागत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले होते. त्याची दखल परिवहन राज्यमंत्री पाटील यांनी घेतली आणि मराठी भाषेतील व्हिडिओ लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे म्हटले आहे.

लर्निंग लायसन्सच्या परीक्षेचा व्हिडिओ मराठीतही येणार
पु. ल. देशपांडे – मराठी मातीचा बहुसांस्कृतिक सुगंध

पाटील म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांना सर्व सुविधा मिळवणे सोयीचे व्हावे हीच परिवहन विभागाची भूमिका आहे. या ऑनलाईन कार्यप्रणालीची माहिती देणारे व्हिडीओ मराठीतूनही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचा राज्यातील ग्रामीण, निमशहरी भागातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल. मराठीतील व्हिडीओतून सविस्तर माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. 'मराठी' भाषेचा आम्हाला अभिमान आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने जिथे जिथे शक्य असेल तिथे 'मराठी'चा पुरस्कार व्हावा, अशीच आमची भूमिका आहे.’’

लर्निंग लायसन्सच्या परीक्षेचा व्हिडिओ मराठीतही येणार
पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज पुन्हा एका शिफ्टमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com