Pune : लग्न ठरताच २ लाख, लग्नानंतर ५ लाखांची मागणी; भांडणानंतर नांदवण्यासाठी २० लाख मागितले, २२ वर्षीय वैष्णवीनं स्वत:ला संपवलं

Vaishnavi late death case : पुण्यात वैष्णवी लाटे नावाच्या २२ वर्षीय विवाहितेनं लग्नानंतर ८ महिन्यातच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसात पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Vaishnavi Late Case Police Register FIR Against Husband Family

Vaishnavi Late Case Police Register FIR Against Husband Family

Esakal

Updated on

Vaishnavi Late Case Police Register FIR Against Husband Family पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी गेल्याची घटना समोर आलीय. लग्नाच्या ८ महिन्यातच २२ वर्षीय विवाहितेने पतीसह सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सुरुवातीला फर्निचरसाठी २ लाख, नंतर पत्नीला नांदवायचं असेल तर ५ लाखांची मागणी केली. ते ५ लाख रुपये दिल्यानंतरही २० लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या कुटुंबियांनी केला आहे. वैष्णवी लाटे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com