पुणे - पूर्व मौसमी पावसाने पुण्याची दाणादाण उडाली तरीही महापालिका अजूनही नाले सफाईच्या कामात जागी झालेली नाही. अंबिल ओढा, नागझरी नाला, भैरोबा नाल्यासह अन्य नाल्यांची सफाई सुरु केली आहे. हे काम ७० टक्के पूर्ण झाल्याचे अधिकारी सांगत आहेत..पण ठेकेदार नाल्यातील गाळ, कचऱ्याची थप्पी नाल्यातच बाजूला लावली जात आहे तर काही ठिकाणी नाल्यामधील कचरा त्याच ठिकाणी पसरवला जात आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे पुन्हा हा गाळ नाल्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदार त्यांचा खर्च वाचवून नफा कमवायच्या नादात पुणेकरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे..पावसाळ्यात शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये. नाल्यांमधून पावसाचे पाणी वाहून जाताना अडथळा निर्माण होऊन वस्त्यांमध्ये पाणी घुसू नये यासाठी महापालिकेने नाले सफाई करण्यासाठी एकूण २३ निविदा काढल्या असून, त्यासाठी तब्बल १४ कोटी ५० लाख रुपये खर्च केला जात आहे. हे काम एप्रिल महिन्यात सुरु झाले होते, हे ७ जून पूर्वी पूर्ण केले जाणार आहे.ज्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता सर्वाधिक आहे असे कलव्हर्ट व अन्य ठिकाणी प्राधान्याने नालेसफाई सुरु केली. हे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर सर्वसाधारण नाले सफाईचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम हे जून महिन्यापर्यंत पूर्ण केले जाईल असे अधिकारी सांगत आहेत..नाले सफाईच्या निविदा ३० टक्क्यांपासून ५३ टक्क्यांपर्यंत कमी रकमेच्या आल्या आहेत. म्हणजे महापालिकेने या कामासाठी जेवढा खर्च अपेक्षित धरला होता, त्यापैकी हे ठेकेदार ३० ते ५२ टक्के कमी खर्चात हे काम करुण देत आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत होत. पण अधिकारी आम्ही काम चांगल्या पद्धतीने करून घेणार असा दावा करत होते.शहरात या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने ठेकेदारांनी केलेल्या कामाची आणि अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल केली आहे. आंबिल ओढ्यात दांडेकर पूल, दत्तवाडी येथे तर ठेकेदाराने भर नाल्यात भराव टाकून काम सुरु केले आहे..त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसामुळे वस्त्यांमध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्याने पुढील नुकसान टळले. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ठेकेदाराला राडारोडा काढण्यास सांगितले जाईल अशी सारवासारव केली.अशीच भयानक अवस्था निलायम थिएटरच्या मागच्या बाजूस आंबिल ओढ्यातील आहे. या ओढ्यातील राडारोडा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे ओढ्याचा अर्धा प्रवाह सुरू आहे. तर अर्धा बंद आहे. ठेकेदाराने हा सर्व राडारोडा काढून टाकणे आवश्यक होते, पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे..महापालिकेच्या मलनिःसारण विभागाचे अधिकारी, अभियंते हे देखील केवळ कागदोपत्री काम झाल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात नाल्यातील स्थिती गंभीर आहे. ठेकेदाराने कमी दराने निविदा भरल्याने ते थातूरमातूर काम करत आहेत. पण ज्यांच्यावर हे काम करून घेण्याची जबाबदारी आहे ते अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत.व्हिडिओमुळे झाली पोलखोलठेकेदाराकडून नाल्यामध्ये जेसीबी, पोकलेन उतरवले जात आहे. नाले सफाई केली हे दाखविण्यासाठी नाल्यातील गाळ उचलून तो नाल्यातच बाजूला टाकला जातो. त्यानंतर काही अंतर पुढे गेले गेल्यानंतर नाल्यात एका ठिकाणी जास्त गाळ जमा झाल्यास तो पसरवून पाण्याखाली दाबला जातो..त्यामुळे गाळ काढून टाकला असा भास होतो. बिबवेवाडीत किमया सोसायटीच्या मागे अशाच पद्धतीने केल्या जाणाऱ्या कामाचे व्हिडिओ ‘सकाळ’च्या हाती लागले असून, त्यामुळे या निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे.उपनगरांमधील स्थिती ही भयानकपुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नाले सफाइच्या कामांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. पण नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावातील नाले सफाईकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष केले. नाल्यामध्ये पोकलेन उतरवून त्याचे व्हिडिओ काढून व जीपीएस टँग असलेले फोटो काढून ते काम झाले असे दाखवले जात आहेत..आत्तापर्यंत किती ट्रक गाळ काढला?नाले सफाईकडे होत असलेल्या दुर्लक्षबाबत अधिक्षक अभियंता संतोष तांदळे यांना विचारले असता ‘नाले सफाई सुरु आहे, नाल्यातील काढलेले गाळ हा येवलेवाडी येथे नेऊन टाकला जात आहे.’ असे त्यांनी सांगितले. पण आत्तापर्यंत किती गाळ काढला हे विचारले असता ही माहिती संकलीत करून द्यावी लागेल असे सांगितले. त्यामुळे नाले सफाईमधून किती गाळ बाहेर काढला याचे उत्तर प्रशासनाकडे नसल्याचेही स्पष्ट झाले..‘बिबवेवाडीतील किमया सोसायटीच्या मागे आंबिल ओढ्यात नाले सफाईचे काम करताना नाल्यातून गाळ बाहेर काढला जात नाही. तो तसाच इतके तिकडे पसरवला जात आहे.- विश्वास महाजन, नागरिक‘निलायम थिएटरच्या मागे आंबिल ओढ्यातील गाळ काढून टाकलेली नाही. यापूर्वी ओढ्याला आलेल्या पुरात या भागात मोठे नुकसान होत आहे. पण ठेकेदार, अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत.’- अनंत घरत, नागरिक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.