
पुणे : वाहतूक कोंडीमध्ये जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या पुणे शहरात वाहनचालकांनीही आपल्या बेशिस्तीमुळे भर टाकली आहे. मागील वर्षभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० लाख ६३ हजार वाहनचालकांना ८९ कोटी ९१ लाखांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी साडेचार लाख वाहनचालकांनी सुमारे ३० कोटी १८ लाख रुपये तडजोड शुल्क भरले आहे. विशेष म्हणजे नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या एक हजार ३४५ वाहनचालकांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.