अमली पदार्थ तस्कर महिलेची कारागृहात रवानगी

अमली पदार्थ तस्कर 
महिलेची कारागृहात रवानगी
Published on

पुणे, ता. २० ः अमली पदार्थ तस्करी आणि विक्री प्रकरणात यापूर्वी कारवाई करूनही वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने मुंढवा पोलिसांनी एका महिलेला ‘पीआयटी-एनडीपीएस’ कायद्यांतर्गत वर्षभरासाठी स्थानबद्ध केले.
रिना रवी गुमाने (वय ३२) हिला कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. मुंढवा पोलिसांनी २०२२ मध्ये अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीप्रकरणी गुमाने हिच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात तिला पुणे सत्र न्यायालयाने ८ ऑगस्ट २०२२ रोजी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पुन्हा अमली पदार्थ विक्री सुरू केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी १९ मे रोजी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणातही तिला अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही तिच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ती पुन्हा अमली पदार्थ विक्री आणि तस्करीत सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर गुमाने हिला ‘पीआयटी-एनडीपीएस’ कायद्यान्वये वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com