

Pune Drunk Police Constable Crashes Car Into Police Commissioner Amitesh Kumar’s Bungalow Gate
esakal
Pune police constable car accident: पुण्यात पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत थेट पोलीस आयुक्तांच्या बंगल्याबाहेर गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. अमोल भिसे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने मंगळवारी (३ नोव्हेंबर) संध्याकाळी कॅन्टोन्मेंट परिसरातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाच्या गेटला आपल्या कारची धडक दिली. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.