अजब कारभार; इ-बस डेपोच्या उद्‍घाटनासाठी खांबावरून वीज पुरवठा

केंद्र शासनाच्या फेम २ योजनेअंतर्गत १५० इ बस प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ९० बसेसचे लोकार्पण आणि इ-बस डेपोचे उद्‍घाटन केले जाणार आहे.
E-bus depo
E-bus deposakal
Summary

केंद्र शासनाच्या फेम २ योजनेअंतर्गत १५० इ बस प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ९० बसेसचे लोकार्पण आणि इ-बस डेपोचे उद्‍घाटन केले जाणार आहे.

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमटी) पुणे स्टेशन येथील ९० इ बसच्या चार्जिंग स्टेशन व डेपोच्या उद्‍घाटनासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे उपस्थित राहणार आहेत. एकीकडे उद्‍घाटनाची लगबग सुरू असताना दुसरीकडे या ठिकाणी विद्युत पुरवठ्याचेच काम अर्धवट असल्याने उद्‍घाटनापुरेत एका खांबावरून १५०० किलो व्हॅटचा जोड घेण्याची अजब शक्कल लढविण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या फेम २ योजनेअंतर्गत १५० इ बस प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ९० बसेसचे लोकार्पण आणि इ-बस डेपोचे उद्‍घाटन केले जाणार आहे. या इ-बस डेपोच्या ठिकाणी महापालिकेने अडीच कोटी रुपये खर्च करून मुंढवा येथून साडे आठ किलोमीटर लांबून विद्युत पुरवठा करण्याची सुविधा केली आहे. मात्र, हे काम अजून पूर्ण झालेले नाही. विद्युत प्रवाह वाहून नेणारी केबल जमिनीच्या किमान तीन फूट खाली असणे आवश्‍यक आहे, पण घोरपडी येथील भीमनगर भागात ही केवळ अर्धा फूटच जमिनी खाली आहे. हे काम धोकादायक पद्धतीने सुरू असल्याने काही नागरिकांनी तक्रार केली आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे केबल तात्पुरती टाकली जात असून, रस्ता रुंदीकरणानंतर जागा उपलब्ध झाल्यास ही केबल रस्त्यातून बाजूला काढली जाईल असा खुलासा महापालिकेचे अधिकारी करत आहेत.

दरम्यान, मुंढवा येथील सब स्टेशनमधून ५५०० किलो व्हॅटचा विद्युत पुरवठा होणे आवश्‍यक आहे. पण महापालिकेची तयारी पूर्ण झालेली नसल्याने महावितरणने या पुरवठ्यास अंतिम मान्यता दिलेली नसल्याने पुणे स्टेशन येथील जवळच्याच खांबावरून १५०० किलोव्हॅटचा पुरवठा उपलब्ध करून घेऊन कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे या पुरवठ्यावर ९० पैकी ३६ बसच चार्ज होऊ शकणार आहेत.

‘केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत इ बस डेपोच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. या डेपोच्या ठिकाणची तयारी पूर्ण झाल्याचे आम्हाला कळविण्यात आले आहे.’

- रमेश चव्हाण, मुख्य अभियंता (मेकॅनिकल), पीएमटी

‘इ बस डेपोसाठी मुंढवा येथून आठ किलोमीटर लांब केबल टाकून ५५०० किलो व्हॅटचा वीज पुरवठा उपलब्ध केला जात आहे. पण या ठिकाणी अजून आरव्ही बसवणे, केबल टाकणे, विद्युत निरीक्षक चार्जिंग मान्यता न झाल्याने हा वीज पुरवठा उपलब्ध झाला नाही. पण ही प्रक्रिया उद्या एका दिवसात आम्ही पूर्ण करून घेऊ. पण पर्यायी व्यवस्था म्हणून एक पोलवरून १५०० किलो व्हॅटचा विद्युत पुरवठा उपलब्ध करून घेतला आहे. त्याद्वारे ३६ बस चार्जिंग होऊ शकतात.’

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com