

Pune faces a massive e-waste challenge as annual volume crosses 20,000 tonnes; PMC launches 'Pahel 2024' plan for 400 new collection centers
Sakal
पुणे : अद्ययावत तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआयचा) इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल साधनांचा वापर वाढला आहे. मात्र या साधनांचा वापर झाल्यानंतर ती निरुपयोगी होऊन कचऱ्याचे (ई-वेस्ट) प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता नियमितच्या कचऱ्यासोबत ई-वेस्टचेदेखील प्रमाण वाढले आहे. मात्र त्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया होऊन विल्हेवाट लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.