esakal | पुणे: बालेवाडीत गणेशोत्सवाची लगबग
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh festival

पुणे: बालेवाडीत गणेशोत्सवाची लगबग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी: गणरायाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे सर्वत्र गणपतीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. बाणेर, बालेवाडी परिसरात चौकाचौकांत गणपती बाप्पाच्या विक्रीसाठी स्टॉल उभारलेले दिसत आहेत.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

दुकानांमध्येही गणपती आराशीच्या साहित्याने सजली आहेत. श्रावण महिना सरत आला की घरातून लहानथोरांना वेध लागतात ते गणपतीच्या आगमनाचे. मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचे सावट असले तरी रुग्णसंख्या कमी असल्यामुळे बाजारपेठेत गौरी गणपतीच्या आराशीचे साहित्य खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.

ज्यांच्या घरी गौरी गणपती असतात त्यांच्या घरातील साफसफाईबरोबरच गौरी गणपतीसाठी कोणती आरास करायची याबद्दल विचार विनिमय सुरू आहे. कोणती गणेशमूर्ती घ्यायची, आपल्याला हवी असलेली मूर्ती आरक्षित करण्यासाठी घरातील सर्व मंडळी गणपतीच्या स्टॉलला जाऊन भेट देत आहेत.

हेही वाचा: पुणे : मिळकत वाटप नियमावलीत होणार सुधारणा

या वर्षी बाजारात विविध प्रकारच्या मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या असून, पीओपीबरोबर शाडू मातीच्या मूर्तीही आहेत. परंतु पीओपीपेक्षा शाडू मातीला मागणी जास्त असल्याचे विक्रेता तुकाराम तिपाले यांनी सांगितले. या वर्षी बाजारात फेटे घातलेल्या मूर्तींना जास्त मागणी आहे. या मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर लालबागचा राजा, कार्टून स्वरूपातील मूर्ती, दगडूशेठ गणपती अशा विविध प्रकारच्या मूर्ती असून, शाडूच्या मूर्तींना चांगली मागणी असून घरातच बाप्पाचे विसर्जन करावे लागणार असल्याने लहानमूर्तीला पसंती मिळत आहे.

या वर्षी पावसामुळे पेणमध्ये मूर्तिकारांचे नुकसान झाल्याने मूर्तींच्या किमती जास्त आहेत. पंधरा दिवस आधी बुकिंग करूनसुद्धा हव्या तशा मूर्ती मिळत नाहीत. - शंभू बालवडकर, विक्रेते, बालेवाडी

loading image
go to top