Education inspector arrested for taking one lakh rupees bribe, ACB Pune investigation,
sakal
पुणे : विना वेतन काम करणाऱ्या एका शिक्षिकेचा ‘शालार्थ आयडी’ मंजूर करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पुण्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे (वय ५७, रा. हडपसर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २५) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.