Pune : चौथ्या औद्यगिक क्रांतीच्या नेतृत्त्वस्थानी भारत; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेंटरकडून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित ‘इनोव्हेशन, डिझाइन अँड आंत्रप्रुनरशीप बूटकॅम्प’च्या उद्घाटनावेळी प्रधान बोलत होते.
 शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानsakal

Pune - पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून आपण आता चौथ्या औद्योगिक क्रांतीपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. पहिल्या तीन क्रांतींमध्ये भारताला फारशी संधी मिळाली नाही. मात्र चौथ्या क्रांतीमध्ये भारत नेतृत्त्वस्थानी आहे, असे मत अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेंटरकडून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित ‘इनोव्हेशन, डिझाइन अँड आंत्रप्रुनरशीप बूटकॅम्प’च्या उद्घाटनावेळी प्रधान बोलत होते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीतारामन, उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, नॅकचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर आगाशे, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी प्रधान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, त्यांच्या नवकल्पनांविषयी माहिती घेतली.

 शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान
Mumbai News : कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरण! IAS संजीव जयस्वाल यांना ईडीचे समन्स

प्रधान म्हणाले, ‘‘ अमेरिकेकडून सडलेला गहू घेणारा, भारत आता जगाला औषधे पुरवू लागला आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात भारत नेतृत्व मिळवत असून, आपल्या शैक्षणिक पद्धतींना जगमान्यता मिळत आहे. भारतात प्रचंड गुणवत्ता आहे. त्यासाठी इंग्रजीची गरज नाही. अनेक विकसित देश हे इंग्रजीला महत्त्व देत नाहीत.

संकल्पना मातृभाषेतून चांगल्या रितीने समजणार आहे. त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने सृजन चांगले होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जगात स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.

 शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान
Mumbai : मनपा कर्मचारी-अधिकाऱ्यांवरील ईडी चौकशी थांबवा! म्युनिसिपल मजदूर संघाची मागणी

’’ भारताच्या नव्या शिक्षणाचे मॉडेल जगातील विविध देशांकडून स्वीकारण्यात येत असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयआयटींचे कॅम्पस आता परदेशात सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. आगाशे यांनी प्रास्ताविक केले.

आगामी काळात ग्रामीण भागातील मुले शहरी मुलांच्या पुढे जाणार आहेत. भारताच्या शिक्षण आणि संशोधनाच्या पद्धती जागतिक स्तरावर स्वीकारले जात आहे. या पद्धती जागतिक स्तरावर स्वीकारले जाऊन उपयोग नाही, तर त्यासाठी गुणवत्तापूर्ण किफायतशीर उत्पादने विकसित व्हायला हवीत.

- धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com