

UGC Warns Universities on Delays
Sakal
पुणे : उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठे यांच्याकडून अनेकदा परीक्षा वेळेत घेतल्या जात नाहीत. किंबहुना पदवी प्रमाणपत्रेही विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध केली जात नाहीत. परीक्षा घेण्यात आणि प्रमाणपत्र देण्यात होणारी दिरंगाई टाळण्यासाठी आता थेट विद्यापीठ अनुदान आयोगानेच (यूजीसी) पुढाकार घेतला आहे. परीक्षा वेळेत न घेतल्यास किंवा प्रमाणपत्रे वेळेत वितरित न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा ‘यूजीसी’ने दिला आहे.