
पुणे : ‘‘राज्यात मुंबईत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) असल्याने दिल्लीतून पुण्यात नवीन ‘आयआयटी’ला लगेचच परवानगी मिळणार नाही. परंतु, ‘सीओईपी’च्या चिखली येथील कॅम्पसला संशोधनात आणि तंत्रज्ञानात समृद्ध करण्यासाठी ‘आयआयटी’चे (मुंबई) मार्गदर्शन आणि सहकार्य मिळवून देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आहे. याद्वारे ‘आयआयटी टू सीओईपी’ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’’ अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.