
पुण्यातल्या पेठेतील एक आजोबा चक्क वयाच्या ८५ व्या वर्षी विवाह करण्यास इच्छुक झाले होते. वृत्तपत्रातील एक जाहीरात वाचल्यानंतर आजोबांनी विवाहाची तयारीच केली. जाहीरात होती, “वर” पाहीजे अशी. आजोबांनी वर पाहिजे जाहीरात पाहिली आणि फोनवरुन संपर्क केला. त्यानंतर असं काही घडलं की आजोबांना एक दोन नव्हे तर अकरा लाखांचा फटका बसला.