पुणे - ‘महापालिकेच्या निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट मशिन’चा वापर न करणे, हजारो मतदारांची नावे अन्य प्रभागात स्थलांतरित करणे, ईव्हीएम मशिन बदलणे, महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे संशयास्पद वागणूक अशा विविध प्रकारांद्वारे महापालिका निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने झाली नाही. निवडणूक आयोगाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली जाईल,’ असा इशारा उमेदवारांनी दिला आहे.