

Workshop in Pune to Guide Election Aspirants
Sakal
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका आणि नगराध्यक्षदासाठीची निवडणूक आता एक महिन्यात होणार आहे. त्यात इच्छुक उमेदवारांना विजयी होण्यासाठी अचूक मार्गदर्शन करण्यासाठी ‘निवडणूक कशी जिंकावी’ ही कार्यशाळा येत्या शनिवारी (ता. ८) पुण्यात होणार आहे. त्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत असून राज्याच्या विविध भागांतून सुमारे एक हजाराहून अधिक इच्छुकांनी सहभागासाठी स्वारस्य दर्शविले आहे. ‘निवडणुकीत विजयी कसे व्हायचे’, याचा कानमंत्र या कार्यशाळेत मिळणार असून, त्याद्वारे इच्छुकांना सभागृहात पोहचण्याची संधी मिळणार आहे.