
पुणे: वाहतुकीच्या समस्येने पुणेकर त्रस्त आहेत. महानगर पालिकेच्या बसमध्ये तुडूंब गर्दी असते. त्यात पुन्हा रस्त्यावरील वाहतूककोंडी ही मोठी समस्या आहे. या समस्येवर काही प्रमाणात का होईना तोडगा निघणार आहे. कारण पुणे महानगर पालिकेच्या ताफ्यात डबल डेकर बस येणार आहे. या बसेसमध्ये ८५ प्रवाशांची वाहतूक क्षमता असेल.