पुणे : एक लाख रुपयांची वीजचोरी उघड; महावितरणकडून गुन्हा दाखल

 crime news
crime newssakal media

पुणे : चाकणजवळील कुरळीमध्ये एस. एल. अॅग्रो फूड्स शीतगृहासाठी रिमोटद्वारे सुरू असलेली एक लाख रुपयांची वीजचोरी (electricity robbery) महावितरणने (MSEB) उघडकीस आणली आहे. मीटरमध्ये वीजवापराची नोंद (Meter units) होऊ नये, यासाठी रिमोट बसविल्यानंतर (remote benefit) अवघ्या १९ तासांमध्ये ही वीजचोरी उघड झाली. याप्रकरणी कंपनी विरुद्ध महावितरणकडून गुन्हा दाखल (FIR against company) केला आहे.

 crime news
"रोज तोंडाची वाफ का दवडता? परिणाम भोगावे लागतील" - पाटील

राजगुरुनगर विभाग अंतर्गत खेड तालुक्यातील चाकणजवळील येथे एस. एल. अॅग्रो फुडच्या शीतगृहासाठी महावितरणकडून उच्चदाब वीजजोडणी दिली आहे. पुणे ग्रामीण चाचणी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी. एन. भोसले यांनी या वीजजोडणीची वार्षिक पाहणी केली, असता त्यांना वीजसंचाच्या मांडणीमध्ये संशय आला. त्यांच्यासह राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता संदीप दारमवार, सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांनी वीजयंत्रणेची पाहणी व तपासणी केली. यावेळी वीजवापरकर्ते मदन केशव गायकवाड व पंच उपस्थित होते.

या तपासणीमध्ये शीतगृहातील वीज यंत्रणेत फेरफार करून दोन इलेक्ट्रॉनिक्स किट बसविल्याचे व त्याआधारे रिमोटद्वारे वीजवापराची नोंद होणार नाही, अशी तांत्रिक व्यवस्था केल्याचे आढळून आले. वीजचोरी सरू असल्याचे आढळून आल्यानंतर पंचनामा केला व दोन इलेक्ट्रॉनिक्स किट व इतर साहित्य जप्त केले. वीजचोरी उघडकीस येण्यापूर्वी १९ तासांच्या कालावधीमध्ये रिमोटद्वारे मीटरमधील वीजवापराची नोंद थांबविल्याचे निदर्शनास आले. यामध्ये १ लाख ४१० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वीजवापरकर्ते मदन केशव गायकवायांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com