maharashtra industry
sakal
पुणे
Pune New : पायाभूत सुविधांमुळे पुणे उद्योगवाढीचे केंद्र; प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मत
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड ॲग्रिकल्चर’तर्फे (एमसीसीआयए) ‘जीसीसी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे - पुण्यासह राज्यात सातत्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. चाकण आणि हिंजवडी या भागात उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या अनुषंगाने बदल होत आहेत. पुणे उद्योगवाढीचे केंद्र बनत आहे. शहरात वाढत असलेले ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) ही एक संधी आहे, त्याबाबत सर्वांनी मिळून काम केले, तर पुणे अधिक चांगले होईल, असा विश्वास प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
