
PMC News
Sakal
पुणे : नदीपात्रात ठिकठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, मात्र महापालिकेकडून त्यावर ठोस कारवाई होत नसल्याची सद्यःस्थिती असून महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याबाबत ‘‘संबंधित नागरिकांना नोटीस बजावली असून खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल,’’ असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.