

पुणे, ता. २२ : राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित आणि खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी जवळपास एक लाख ४५ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी एक लाख १५ हजार ५३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून मान्यतेसाठी अर्ज सादर केला आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता अर्ज सादर करण्यासाठी दोन जुलैपर्यंत अंतिम मुदत दिली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता तीन वर्षे कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला अभ्यासक्रम राबविणाऱ्या शिक्षण संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.
या प्रवेश प्रक्रियेत नोंदणीची मुदत संपल्यानंतर ई-स्क्रुटनी पद्धतीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धतीद्वारे नोंद होणारे, पडताळणी आणि निश्चित होणारे अर्ज संस्था स्तरावरील आणि कॅप व्यतिरिक्त जागांसाठीच विचारात घेतले जातील, असे तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
प्रवेश प्रक्रियेचा तपशील :
- प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे : २ जुलैपर्यत
- तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ४ जुलै
- तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार असल्यास सादर करणे : ५ आणि ६ जुलै
- अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ८ जुलै
- अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://poly26.dtemaharashtra.gov.in/
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.