esakal | खासगी केंद्रांचे लसीकरण शुल्क समान करा; महापालिकेची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

Pune PMC Pune No entry

खासगी केंद्रांचे लसीकरण शुल्क समान करा; महापालिकेची भूमिका

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : खासगी रुग्णालयांच्या लसीकरण केंद्रांवर ८०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत शुल्क घेतले जात आहे. या लसीकरणाच्या शुल्कात एक समानता असावी अशी मागणी महापालिका प्रशासन राज्य शासनाकडे करणार आहे, असे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले. तर ९०० पेक्षा जास्त शुल्क घेणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करा असा ठराव करण्यात आला आहे. शहरात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. रुग्णालयात लसीसह पाणी, चहा, नाष्टा अशा सुविधाही दिल्या जात आहेत. बसण्याची चांगली व्यवस्था आदी सुविधांमुळे पैसे देखील जास्त घेतले जात आहेत. शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये सारखे दर असावेत अशी मागणी होत असताना याबाबत महापालिका प्रशासनाने देखील भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा: बारामतीतील कोरोना स्थितीबाबत मोठी बातमी

‘‘खासगी लसीकरण केंद्रांवरील शुल्क भिन्न आहे. ते एकसमान असले पाहिजे यासाठी राज्य शासनाची पत्रव्यवहार केला जाणार आहे. रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधांमुळे लसीकरणाचे शुल्क वाढले आहे.’’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

‘‘ खासगी लसीकरण केंद्रांवर केल्या जाणाऱ्या लसीकरणामुळे शहराला मदत होत आहे. पण प्रत्येक केंद्रांवर भिन्न स्वरूपाचे शुल्क असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील लसीकरणाचे दर समान असावेत.’’

- मुरलीधर मोहोळ, महापौर

‘‘खासगी रुग्णालयांनी ९०० पेक्षा जास्त शुल्क घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाप्रमाणे दुर्बल घटकांना लसीकरणात सवलत देण्याबाबत रुग्णलयांनी तयारी दाखवली पाहिजे, असा ठराव करण्यात आला आहे.’’हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समितीׇ