Pune : खळबळजनक! शुक्रवार पेठेतील सदनिकेत आढळले दांपत्याचे मृतदेह

त्यांची दोन्ही मुले ही अमेरिकेत वास्तव्यास आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Pune death news
Pune death newssakal
Updated on

Pune - शुक्रवार पेठेतील चिंचेच्या तालमीजवळ असलेल्या एका सदनिकेत ज्येष्ठ दांपत्य मृतावस्थेत आढळले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यांची दोन्ही मुले ही अमेरिकेत वास्तव्यास आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेमंत रामकृष्ण थोरात (वय ६४) आणि त्यांची पत्नी सुनीता थोरात (वय ५८, दोघे रा. सेवा मित्र मंडळाजवळ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ) असे दांपत्याचे नाव आहे. थोरात यांच्या घराचा दरवाजा बराच वेळ बंद असल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी बाहेरून हाक दिली. परंतु आतून कोणीही प्रतिसाद दिला नाही.

Pune death news
Mumbai : महावितरणची जुनी थकबाकी वसुली बेकायदेशीर, ग्राहकांनी जागरूक रहावे; होगाडे यांचे आवाहन

याबाबत शेजाऱ्यांनी खडक पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोचले असता त्यांना सुनीता बेडवर बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. तर, हेमंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. पोलिसांनी दांपत्यास ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Pune death news
Mumbai : पीओपी गणेशमुर्ती बंदीला भाजपचा विरोध

हा प्रकार रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. हेमंत थोरात हे एका सहकारी बॅंकेतून सेवानिवृत्त झाले होते. तर, सुनीता तीन-चार वर्षांपासून आजारी होत्या. थोरात यांचा एक मुलगा आणि मुलगी अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांच्या नातेवाइकांकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होइल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.