Pune News : मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी महोत्सव

या प्रदर्शनाचा शेतकरी, महिला बचत गट व उद्योग व्यावसाय सुरु करणाऱ्या युवक-युवतींना फायदा होणार आहे.
मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती
मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीsakal

मंचर - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी महोत्सव २०२३ अंतर्गत कृषी प्रदर्शना ला शुक्रवारी पहिल्या दिवशी शेतकरी, व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आधुनिक शेती अवजारे, नव्याने विकसित झालेली रोपे, खरेदीसाठी व खवय्यांची साजूक तुपातील पुरणपोळी, मासवडी, मटन बिर्याणी मच्छी फ्राय चा आस्वाद घेण्यासाठी झुंबड उडाली होती.

"या प्रदर्शनाचा शेतकरी, महिला बचत गट व उद्योग व्यावसाय सुरु करणाऱ्या युवक-युवतींना फायदा होणार आहे.येथे आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित शेती विषयी परिपूर्ण माहिती उपलब्ध आहे. प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी.” असे आवाहन राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेच्या संचालिका पूर्वा वळसे पाटील यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रोटरी क्लब ऑफ मंचर व अनुसया महिला उन्नती केंद यांच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी महोत्सवाचे उद्घाटन पूर्वा वळसे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२७) झाले.

यावेळी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मंचर रोटरी क्लबचे अध्यक्ष आदिनाथ थोरात, बाळासाहेब पोखरकर, सचिन काजळे, प्रा.डॉ.पंजाबराव कथे, ज्ञानेश्वर घोडेकर, सोपान नवले, अभियंताबाळासाहेब पोखरकर उपस्थित होते.

बेंडे म्हणाले “कृषी प्रदर्शनाचे हे ११वे वर्ष आहे.विशेषतः शेतकऱ्यांना आधुनिक अवजारे येथे किफायतशीर किमतीत मिळतात.रोपे व बटाटा लागवडीचे आधुनिक यंत्र उपलब्ध आहेत.”

आदिनाथ थोरात म्हणाले “ माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, कमलराज आणि मॉन्टेस व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहकार्य मिळाल्यामुळेच रोटरी क्लबने कृषी प्रदर्शन भरविण्यासाठी पुढाकार घेतला. २०० व्यावसायिक येथे सहभागी झाले आहेत.

खवय्यांसाठी पाणीपुरी, मासवाडी, साजूक तुपातील पूरणपोळी, चिकन, मटन चिकन बिर्याणी, बोनलेस मच्छी, आईसक्रिम आदी बचत गटांचे स्टॉल आहेत. सोमवार (ता.३०) पर्यंत कृषी प्रदर्शन आहे.सर्वाना विनामुल्य प्रवेश आहे.”

पुणे जिल्हा ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोरे यांनी प्रास्तविक केले. आशिष पुंगलिया एडवोकेट बाळासाहेब पोखरकर यांनी सूत्रसंचालन व मंचर रोटरी क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत बागल यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com