esakal | पुणे : पालघन, कोयता हातात घेऊन व्हिडीओ करणे पडले महागात
sakal

बोलून बातमी शोधा

 पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पालघन, कोयता हातात घेऊन व्हिडीओ करणे पडले महागात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोयता हातात घेऊन तो समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले. दहशत पसरविण्यासाठी दोघांनी हा प्रकार केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या.

राहुल मलाप्पा चौगुले (वय 19, रा. वाघोली), रोहन अनिल देडगे (वय 24, रामटेकडी, वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कोयता आणि पालघन जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलवारी, कोयते, पालघन किंवा विविध प्रकारची शस्त्रे हातात घेऊन त्याची छायाचित्रे, व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारीत करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून अशा व्यक्ती, तरुणांच्या समाजमाध्यमांवर बारकाईने लक्ष दिले जात आहे. त्यानुसार पालघन हातात घेत त्याचा व्हिडीओ प्रसारीत करणारे दोघेजण वाघोलीतील एका बांधकाम प्रकल्पाच्या मैदानावर येणार असल्याची खबर मिळाली होती.

हेही वाचा: शेतकरी संघटनांची 27 नोव्हेंबरला बंदची हाक

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा रचून पहिल्यांदा राहूल चौगुले यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून पालघन जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी हातात कोयता घेऊन त्याचा व्हिडीओ बनविणारा रामटेकडीमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने पोलिसांनी रोहन देडगे यालाही अटक केली. सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट सहाचे पोलिस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस कर्मचारी मच्छिंद्र वाळके, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, संजीव कळंबे यांच्या पथकाने केली.

loading image
go to top