पुणे : युद्धसदृष्य चित्र के के रेंजवर मिळाले अनुभवायला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Army Tank

काही सेकंदात सुटणारा तोफेचा गोळा शत्रूची एका पाठोपाठ एक ठिकाणे ताब्यात घेत पुढे वाटचाल करत असलेले युद्धसदृष्य चित्र शुक्रवारी नगर येथील के के रेंजवर अनुभवायला मिळाले.

पुणे : युद्धसदृष्य चित्र के के रेंजवर मिळाले अनुभवायला

पुणे - सीमारेषेच्या विस्तीर्ण भूप्रदेशावर शत्रू देशाकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी लक्ष्याचा अचूक मारा करत, मातीचा धुरळा उडवत जाणारे शक्तिशाली रणगाडे शत्रूच्या गोट्यात धडकी भरवण्याचे काम करतात. काही सेकंदात सुटणारा तोफेचा गोळा शत्रूची एका पाठोपाठ एक ठिकाणे ताब्यात घेत पुढे वाटचाल करत असलेले युद्धसदृष्य चित्र शुक्रवारी नगर येथील के के रेंजवर अनुभवायला मिळाले.

या चित्तथरारक प्रात्यक्षिके दरम्यान स्वदेशी बनावटीचे टी-९०, टी-७२ हे रणगाडे आपली क्षमता सिद्ध करत वेगवान हालचाली करत होते. रणगाड्यात बसलेले चालक, गनर आणि कमांडर एकमेकांशी योग्य प्रकारे समन्वय साधत लक्ष्य भेदण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसून आले. तर पाणी आणि जमिनीवर अशा दुहेरी परिस्थितीमध्ये आपली कार्यक्षमता दर्शविणारी बीएमपीचे प्रात्यक्षिके ही सादर करण्यात आली. पाण्यावर तरंगत पुन्हा जमिनीवर येऊन आपली आक्रमकता यावेळी बीएमपी वाहनाने सिद्ध केले. यासाठी जवानांना देण्यात आलेल्या विशिष्ट प्रशिक्षणाची यावेळी कौशल्य पहावयास मिळाली. बोटी प्रमाणे पाण्यात तरंगणारे रणगाडे आणि धुराचे लोट सोडत शत्रूला चकवा देणारे प्रतक्षिक दाखवत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली.