तरुणीच्या विनयभंग प्रकरणात अटक होईल, ५५ वर्षीय प्राचार्याला धमकावत ७ लाख उकळले; PSI, रिलस्टार महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा

Pune Police : एका कॉलेज तरुणीनं तुमच्याविरोधात तक्रार दिलीय आणि अटक टाळण्यासाठी पैसे द्यावे लागतील असं सांगून तब्बल ७ लाख रुपये उकळले. पुन्हा चौकशीसाठी दुसऱ्या पोलिसांनी बोलावल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
Extortion racket exposed in Pune involving PSI and woman constable

Extortion racket exposed in Pune involving PSI and woman constable

Esakal

Updated on

पुणे पोलीस दलात खळबलळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. एका प्राचार्याकडून पोलिसांनीच खंडणी उकळली असून या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कॉलेज तरुणीनं तुमच्याविरोधात तक्रार दिलीय आणि अटक टाळायची असेल तर पैसे द्यावे लागतील असं सांगून तब्बल ७ लाख रुपये उकळले. पीएसआयसह दामिनी पथकात काम करणाऱ्या महिला पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी पथकातील पोलीस सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com