

pune crime news
esakal
Pune Latest News: ‘माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर दोन लाख रुपये दे; अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते,’ अशी धमकी देत एका महिलेने दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने यापूर्वीही उच्च न्यायालयात वकील असल्याचे भासवून एका ४७ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या व्यक्तीला गुंगीचं औषध देऊन त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी तिने अत्याचार केले होते, असा पीडित पुरुषाचा आरोप आहे.