पुण्यातल्या बनावट नोटांचं मुंबईच्या भेंडीबाजारशी कनेक्शन; लष्कराचा कर्मचारीच सूत्रधार

pune fake currency racket has mumbai bhendi bazaar connection
pune fake currency racket has mumbai bhendi bazaar connection

पुणे : विमाननगर परिसरातील संजय पार्क सोसायटीतील बंगल्यातून एकूण 87 कोटी 5 लाख 75 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात अटक आरोपींचे मोठे रॅकेट असून लष्करातील लान्स नायक हाच मुख्य सूत्रधार आहे. आरोपींनी बनावट नोटांच्या बंडलला खऱ्या नोटा लावून त्याद्वारे काळा पैसा असणाऱ्या आणि हवाला करणाऱ्या काही जणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस चौकशीत या नोटांचं मुंबईच्या भेंडी बाजारशी असलेलं कनेक्शन उघडकीस आलयं.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या गुन्ह्यातील अटक आरोपींनी स्वस्तात चलन देण्याचे आमिष दाखवणारे व्हिडीओ तयार केले आहेत. हे व्हिडिओ ज्यांच्याकडे काळा पैसा आहे किंवा हवाला करणाऱ्यांना पाठवण्यात येणार होते. जप्त करण्यात आलेली रक्कम ही मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री उशिरापर्यंत तिची मोजणी सुरू होती. शेख अलिम समद गुलाब खान (वय  36,  रा. जेडीसी पार्क, प्रतिकनगर, येरवडा) असे या लान्स नाईकचे नाव असून तो संरक्षण दलातील बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप खडकी या ठिकाणी कार्यरत आहे. त्याच्यासह सुनील बद्रीनारायण सारडा (वय  40), अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान (वय 43), अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान (वय  18), रितेश रत्नाकर (वय 34) आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (वय 28) यांना अटक करण्यात आली आहे.

लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही रक्कम, पाच मोबाइल, रोख दोन लाख 89 हजार रुपये, एक हजार 200  अमेरिकन डॉलर, चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या 13 नोटा, एक कार आणि इतर साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या चलनामध्ये दोन हजार, एक हजार, पाचशे रुपयांच्या नोटा आहेत. त्यांच्यावर 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' असे नमूद आहे. नोटा ठेवण्यात आल्या होत्या त्या बंगल्याच्या मालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

संबंधित नोटा बंगल्यात का ठेवल्या होत्या? या नोटांद्वारे व्यवहार करून आरोपींनी कोणाला फसवले आहे का? टोळीत अजून कोणाचा सहभाग आहे का? तसेच मुख्य सूत्रधार खान याचा या गुन्ह्यामागील उद्देश काय आहे? याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांनी आरोपींची 15 जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांनी याबाबत विमानतळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नोटा मुंबईतील भेंडी बाजारातून आणल्या
आरोपींकडे चौकशी करण्यात आली तेव्हा बनावट चलन मुंबईतील भेंडी बाजारातून आणले असून जप्त करण्यात आलेल्या बनावट चलनाचा वापर ते फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी करणार असल्याची कबुली दिली आहे. भेंडी बाजारात लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा मिळतात. काही नोटांवर ‘बच्चोका रिझव्र्ह बँक’ असे देखील लिहिल्याचे आढळून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com