Vandan Nagarkar : प्रसिद्ध एकपात्री कलाकार वंदन नगरकर यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेते राम नगरकर यांचे पुत्र, ‘रामनगरी’ या एकपात्री प्रयोगाचा वसा पुढे नेणारे प्रसिद्ध एकपात्री कलाकार व कॉर्पोरेट ट्रेनर वंदन राम नगरकर यांचे निधन झाले.
Vandan Nagarkar
Vandan NagarkarSakal
Summary

प्रसिद्ध अभिनेते राम नगरकर यांचे पुत्र, ‘रामनगरी’ या एकपात्री प्रयोगाचा वसा पुढे नेणारे प्रसिद्ध एकपात्री कलाकार व कॉर्पोरेट ट्रेनर वंदन राम नगरकर यांचे निधन झाले.

पुणे - प्रसिद्ध अभिनेते राम नगरकर यांचे पुत्र, ‘रामनगरी’ या एकपात्री प्रयोगाचा वसा पुढे नेणारे प्रसिद्ध एकपात्री कलाकार व कॉर्पोरेट ट्रेनर वंदन राम नगरकर (वय ६१) यांचे मंगळवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. वैजयंती आणि कन्या विनिषा असा परिवार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वर्षभरापासून वंदन नगरकर फुफ्फुसाच्या संसर्गाने त्रस्त होते. चेन्नई येथील रुग्णालयात दीर्घ काळ उपचार घेऊन ते पुण्यात परतले होते. शुक्रवारी (ता. २४) ते ६२ व्या वर्षांत पदार्पण करणार होते, मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

वंदन नगरकर यांनी अभिनव कला महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले होते. ते जाहिरात क्षेत्रात कार्यरत असताना व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रेरणादायी वक्ते म्हणून काम करत होते. राम नगरकर यांच्या निधनानंतर दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी ‘रामनगरी’ या कार्यक्रमाचे प्रयोग सुरु केले आणि सुमारे हजार प्रयोगांचा टप्पाही पार केला.

Vandan Nagarkar
Mahavitran Arrears : महावितरणला थकबाकीचा ‘शॉक’

सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्यासमवेत ते ‘मालक नको, पालक व्हा’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करत असत. कॉर्पोरेट क्षेत्रात प्रशिक्षकाच्या भूमिकेतून त्यांनी विद्यार्थापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत दोन हजार कार्यशाळा घेतल्या होत्या. व्यक्तिमत्त्व विकासावर त्यांनी आठ पुस्तकांचे लेखन केले. राम नगरकर कला अकादमी तसेच एकपात्री कलाकार संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com