esakal | पुणे: विद्यापीठाची ‘एनआयआरएफ रँकिंग’ घसरली
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विद्यापीठाची ‘एनआयआरएफ रँकिंग’ घसरली

पुणे : विद्यापीठाची ‘एनआयआरएफ रँकिंग’ घसरली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय पातळीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ २०२१ ची क्रमवारी जाहीर झाली असून, विद्यापीठांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अकराव्या स्थानावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत विद्यापीठाचे स्थान दोन क्रमांकानी घसरले आहे.

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ कडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. गुरुवारी (ता.९) ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एकूण गुण ५८.३४ असून दहाव्या स्थानावर असलेल्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणांमध्ये केवळ ०.६३ गुणांचा फरक आहे.

हेही वाचा: BRICS : कोरोना काळात सामूहिक प्रयत्नांनी मिळालं यश - PM मोदी

शहरातील खासगी विद्यापीठे -

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असून, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ ४९ व्या आणि भारती विद्यापीठ यंदा ६८ व्या क्रमांकावर आहे.

सर्ंवर रॅंकींगमध्ये २० वे स्थान

राज्यातील प्रमुख विद्यापीठांची क्रमवारी :

क्रमवारी : विद्यापीठ : गुण

११ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ५८.३४

१८ : होमी भाबा राष्ट्रीय विद्यापीठ, मुंबई : ५३.२४

३७ : टाटा समाजविज्ञान संस्था (टीस), मुंबई : ४८.३७

३८ : सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे : ४८.२२

४९ : डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे : ४६.७४

६८ : भारती विद्यापीठ, पुणे : ४२.१०

७१ : मुंबई विद्यापीठ : ४१.५६

मागील वर्षीच्या तुलनेत दोन क्रमांकाने आपण खालच्या क्रमवार आलो असलो तरी प्रामुख्याने याची दोन कारणं आहेत. विद्यापीठ कॅम्पस बंद असल्याने परदेशी विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे तसेच ग्यान सारखे आंतरराष्ट्रीय शिक्षकांचा सहभाग असणारे कार्यक्रम यावर्षी कोविडमुळे होऊ शकले नाहीत, याचा परिणाम क्रमवारीवर झालेला दिसत आहे. तरीही मिळालेल्या यशाबद्दल मला नक्कीच आनंद आहे.

- प्रा.डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

loading image
go to top