Pune
Punesakal

Pune : अडत्याने प्रशासनाची दिशाभूल करत शेतकर्‍याची लूट

फुलांच्या शेतकर्‍याकडून भराई, तोलाई वसुलीचा प्रकार

पुणे : विजयादशमीच्या दिवशी मार्केट यार्डात फुले विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकर्‍याकडून तरकारी विभागातील अडतदाराने भराई आणि तोलाई वसूल केली आहे. तरकारी विभागात फुलांच्या व्यवहाराची परवानगी आणि शेतकर्‍याकडून भराई, तोलाई वसुलीचा अधिकार नाही. तरीही संबंधित अडत्याने प्रशासनाची दिशाभूल करत शेतकर्‍याची लूट केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सातारा जिल्ह्यातून एका शेतकऱ्याने 4 ऑक्टोबर रोजी मार्केट यार्डात 724 किलो फुले विकण्यासाठी आणली होती. यावेळी, त्या शेतकर्‍याने बाजारातील एका अडत्याकडे 724 किलो झेंडूचा व्यवहार केला. फुल खरेदीनंतर अडत्याने गाडीमधील काही क्रेट खाली केले. त्यानंतर, पावती करताना त्याने त्यामध्ये विशिष्ट हमालीची रक्कम नमूद केली. तसेच, भराई व तोलाईचे पैसे त्याच्या पैशातून वजा करत शिल्लक रक्कम शेतकर्‍याकडे सूपूर्त केली.

एरवी फुलबाजारात शेतकर्‍यांच्या पट्टीतून हमाली व तीन टक्के अनुषांगिक खर्च वजा करत शिल्लक रक्कम शेतकर्‍यांना देण्यात येते. मात्र, सणासुदीच्या काळात चार पैसे मिळतील या अपेक्षेने फुले घेऊन आलेल्या शेतकर्‍यावर तरकारी विभागातील अडतदाराने अनावश्यक तोलाई आणि भराईचा बोजा टाकत लुट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन खरोखरच शेतकर्‍ यांचा विचार करते का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फुलांचा व्यवहार तरकारी विभागात होणे हे चुकीचे आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक शेतकर्‍याने यास्वरुपाचे धोरण अवलंबल्यास बाजार आवारात विस्कळितपणा येईल. त्यासाठी प्रशासनाने सणासुदीच्या काळात आवकेच्या पार्श्वभूमीवर फुलबाजारातील अडतदारांसाठी तशी सोय करून देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून शेतकरी फुलबाजारात फुल आणण्यास प्रवृत्त होतील. त्यांची फसवणुक होणार नाही. तसेच बाजार समितीला सेसरुपी उत्पन्नही मिळेल.

- अरूण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन.

या प्रकरणाची माहिती घेऊन तरकारी विभागातील अडत्यांनी केवळ तरकारीची विक्री करावी याबाबत समज देण्यात येईल. शेतकर्‍याने तरकारी विभागातील ओळखीच्या अडतदाराकडे फुलांचा व्यवहार केला त्यामुळे त्याकडून भराई व तोलाई वसुल करण्यात आली. त्याने फुलबाजारात व्यवहार केला असता तर त्यानुसार अनुषांगिक खर्च वसुल करण्यात आला असता. फुलमहोत्सवात फुलांची विक्री केली असती तर त्याकडून कोणताही अतिरिक्त खर्च वसुल करण्यात आला नसता.

- मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com