esakal | Pune: शेतकरी कुटुंबातल्या मुलाचं आयएएस होण्याचे स्वप्न साकार
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी कुटुंबातल्या मुलाचं आयएएस होण्याचे स्वप्न साकार

पुणे : शेतकरी कुटुंबातल्या मुलाचं आयएएस होण्याचे स्वप्न साकार

sakal_logo
By
महेश जगताप

स्वारगेट : आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे, जास्त परिस्थितीचा बाऊ करायचा नाही, मिळालेल्या संधीला शिस्तबद्धपणे सामोरे जायचं, हातात घेतलेल्या कामात सातत्य ठेवल्यास कितीही मोठं लक्ष असेल तर ते साध्य होऊ शकतं, असच आपल्यासमोर उदाहरण ठेवलं आहे ते म्हणजे केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या ( यु पी एस सी) सहाव्या प्रयत्नात तब्बल आठ वर्षे अभ्यास करीत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील निवृत्ती आव्हाड यांनी १६६ रँक मिळवून यश मिळवून आयएएस होण्याचा स्वप्न साकार केल आहे.

सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या निवृत्ती आव्हाड यांनी नाशिक जिल्ह्यातील गुळवंच शेजारील निमगावच्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीचे शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण बारागाव पिंपरी माध्यमिक विद्यालयात तर ११ वी व बारावी सिन्नरच्या महाविद्यालयातून उत्तीर्ण झाले. सिंहगड महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेऊन आव्हाड यांनी एसआर कंपनीत ओरीसात नोकरी केली. याच काळात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत मुंबईतील मंत्रालयात ते कक्ष अधिकारी झाले. तर २०१६ च्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून ते भारतीय वाणिज्य सेवेत दाखल (आयआरएस) झाले. सध्या ते जबलपूर येथे आयकर उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. सेवेत असतानाच त्यांनी पुन्हा २०२० मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

हेही वाचा: Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट

वडील सोमनाथ आणि आई मंदा यांना एक मुलगा आणि तीन मुली. सामान्य शेतकरी कुटुंबात शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना निवृत्ती यांनी अंगभूत हुशारीवर अथक मेहनत घेऊन जिद्दीने हे यश प्राप्त केले. माझ्यासाठी हे यश काहीसे अनपेक्षित असले तरी स्वप्नपूर्ती आहे असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले .

आव्हाड यांच्या मातापित्यांची संपर्क साधला असता त्यांनी आनंद गगनात मावत नसल्याचे सांगितले हा मुलाच्या कष्टाचा विजय आहे असे मत व्यक्त केले . आव्हाड यांच्या पत्नी पूजा यांनीही यश वर्णन करण्यासाठी शब्द सुचत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांना चार वर्षाचा राजवीर नावाचा मुलगा आहे.

निवृत्ती आव्हाड आणि मी पुण्यात सोबत अभ्यास केला आहे .त्याच्या यशात सर्वात महत्वाचा त्याच्याकडे असलेला गुण म्हणजे सातत्य..याने अतिशय कष्टाने अभ्यासात सात्यात ठेवले त्यामुळे इतकी वर्षे अभ्यास करून त्याने त्याच स्वप्न साकार केले .

आशिष बारकुल ( उपजिल्हाधिकारी )

loading image
go to top