esakal | पुण्यातील फॅशन स्ट्रीट आगीतील पीडितांना आवश्यक ती मदत करू - डॉ अमोल कोल्हे 
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Kolhe

छत्रपती शिवाजी मार्केट व फॅशन स्ट्रीट बाजारपेठेला लागलेल्या आगीमुळे व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहेत.

पुण्यातील फॅशन स्ट्रीट आगीतील पीडितांना आवश्यक ती मदत करू - डॉ अमोल कोल्हे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : छत्रपती शिवाजी मार्केट व फॅशन स्ट्रीट बाजारपेठेला लागलेल्या आगीमुळे व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहेत. यामुळे शासनाकडे मदतीची आस लावून बसलेल्या व्यावसायिकांना खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या भेटीमुळे धीर आला आहे. यावेळी नुकसानग्रस्त जागेची पाहणी करत दुकानदारांची खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आवश्यक ती मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. 

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून कडक निर्बंध; सायंकाळी 6 ते सकाळी 6 संचारबंदी

महात्मा गांधी रस्त्यालगत असलेल्या फॅशन स्ट्रीट बाजारपेठेला लागलेल्या आगीत 571 दुकाने तर छत्रपती शिवाजी मार्केट येथील चिकन व माशांची 25 दुकाने जळून खाक झाली.  बाजारपेठेच्या मैदानात असलेल्या राडारोडा मुळे व्यवसायही बंद आहे. त्यामुळे हे व्यापारी दुहेरी संकटात सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने पंधरा दिवसात बाजारपेठ खुली करून देण्याचे आश्वासन दिले आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी दुपारी दोन्ही बाजारपेठेला भेट दिली. यावेळी व्यापाऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. 

हेही वाचा - पुणे विद्यापीठाच्या परीक्षेसाठी अद्यापही २५ टक्के विद्यार्थी वेळापत्रकाच्या प्रतिक्षेत
यावेळी व्यापाऱ्यांनी डॉक्टर कोल्हे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. त्यात केलेल्या मागण्या प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी हसीना इनामदार, अल्ताफ शेख, तौफिक शेख, इरफान कुरेशी, जहीर शेख आदी उपस्थित होते  बाजारपेठेतील व्यापारी उपस्थित होते.

loading image