esakal | Pune: पुणेकरांना टोलचा भुर्दंड; फास्टॅगधारकांकडून वसुली
sakal

बोलून बातमी शोधा

toll plaza

पुणे : पुणेकरांना टोलचा भुर्दंड; फास्टॅगधारकांकडून वसुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर टोलमाफी असूनही फास्टॅगधारक ‘एमएच १२’ आणि ‘एमएच १४’ या पासिंगच्या वाहनांना टोलमाफीऐवजी भुर्दंड सहन करावा लागत आहे. फास्टॅगमधून वजा झालेला टोल परत मिळावा किंवा टोल माफी असलेल्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवावी, अशी मागणी स्थानिक प्रवासी करत आहेत. मात्र, आमच्याकडे त्याचा काहीही इलाज नाही, असे सांगून टोल प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे.

खेड शिवापूर टोल नाका हटविण्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीतर्फे आंदोलन केले होते. त्यावेळी या टोल नाक्यावरून हवेली (पुणे शहर+ पिंपरी चिंचवड), भोर, वेल्हे, मुळशी आणि पुरंदर या तालुक्यातील वाहनांना टोल माफी देण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांनी सांगितले होते.

हेही वाचा: IPL 2021: शेवटच्या चेंडूवर षटकार; RCB चा दिल्लीवर थरारक विजय

तेव्हापासून या टोल नाक्यावर या पाच तालुक्यातील वाहनांना टोल माफी देण्यात येत आहे. मात्र, याच तालुक्यातील फास्टॅगधारक वाहनांचा मात्र फास्टॅगमधून टोल वजा होत आहे. त्यामुळे स्थानिक असूनही त्यांना टोलमाफी मिळत नसून भुर्दंड सहन करावा लागत आहे.

टोल माफी असलेल्या वाहनांच्या फास्टॅगमधून खेड शिवापूर टोल नाक्यावर पैसे वजा झाल्यास ते पैसे परत मिळावेत, अथवा अशा टोल माफी असलेल्या वाहनांसाठी फास्टॅग सेन्सर नसलेल्या स्वतंत्र मार्गिका ठेवाव्यात, अशी मागणी स्थानिक प्रवासी करत आहेत.

हेही वाचा: पुणे : विद्यमान २७ नगरसेवकांचे भवितव्य अस्पष्ट

स्थानिक असल्याचे ओळखपत्र दाखविल्यानंतर टोल माफी असलेल्या वाहनांना खेड शिवापूर टोल नाक्यावर विना टोल सोडले जात आहे. मात्र, टोल माफी असलेल्या वाहनांच्या फास्टॅगमधून टोल वजा होऊ नये, यासाठी कोणतेही उपाययोजना करणे अथवा स्वतंत्र मार्गिका ठेवणे शक्य नाही. स्थानिक प्रवाशांनी एकतर येथून प्रवास करताना वाहनांचा फास्टॅग बाजूला काढून ठेवावा, नाहीतर स्थानिकांसाठी असलेला मासिक पास घ्यावा.

- अमित भाटिया, व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रस्ता

loading image
go to top