Pune FDA: दिवाळीआधी पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! ४ हजार किलोहून अधिक खाद्यपदार्थांचा साठा जप्त

Pune Sweet Shops Face FDA Action Ahead of Diwali: पुण्यातील मिठाई विक्रेत्यांना एफडीएचा दणका; १२ दुकानांची तपासणी, हजारो किलो साठा जप्त
Pune Food Safety Action FDA Inspects 12 Establishments and Seizes More Than 4000 Kg of Sweets Ghee and Other Food Products

Pune Food Safety Action FDA Inspects 12 Establishments and Seizes More Than 4000 Kg of Sweets Ghee and Other Food Products

esakal

Updated on: 

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात धडक कारवाई केली. बाणेर, वानवडी, गणेश पेठ, देहू, कोथरूड, मुंढवा यांसह विविध भागांतील १२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये लाडू, बुंदी, तूप, मावा, बर्फी आणि अन्य खाद्यपदार्थांचा चार हजार २१ किलोहून अधिक साठा नष्ट आणि जप्त करण्यात आला. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही आस्थापनांचे व्यवसाय निलंबित किंवा स्थगित करण्यात आले.

Loading content, please wait...