Pune Festival 2022 : साक्षी पाटील ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Festival 2022

Pune Festival 2022 : साक्षी पाटील ‘मिस पुणे फेस्टिव्हल’

मिस पुणे फेस्टिव्हलमध्ये साक्षी पाटील सौंदर्यस्पर्धेची विजेती ठरलीये. तर मानसी ताम्गोले आणि भाविका अडसुळे या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आल्या. स्पर्धेतील मानकऱ्यांना पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मिस स्कुबा इंटरनॅशनल वर्षा राजखोवा आणि मिस अर्थ इंडिया तन्वी खरोटे यांचा हस्ते मुकुट परिधान करण्यात आला. याशिवाय बेस्ट ग्लोइंग स्किन – सिद्धी गांधी, बेस्ट स्माइल – शुभश्री बोरठाकूर, बेस्ट टॅलेंट – उर्वी शाह, बेस्ट फिटनेस मॉडल – कुमुदनी पाटील आणि मिस फोटोजेनिक – भाविका अडसुळे यांची निवड करण्यात आली.

१९८९ मध्ये सुरूवात झालेल्या पुणे फेस्टिव्हलचे २ सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले. मंगळवारी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सौंदर्यवतींसाठी स्पर्धा पार पडली. महिलांचे व्यक्तिमत्व आणि सौंदर्य या बरोबरच कुटुंब व समाजाबद्दलचा दृष्टीकोन, प्रेझेंटेशन या निकषांच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाते. यावर्षी १८ ते २५ वर्षे वयोगटातील १५० युवतींनी यामध्ये भाग घेतला होता त्यातून अंतिम फेरीसाठी २० तरुणींची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत ३ भाग असून पहिल्या फेरीत लेहेंगा, साडी, घाघरा (एथनिक) अशी वेशभूषा होती. श्वेता दरेकर यांनी याचे एथनिक डिझाईन केले होते. या तरुणींनी स्वपरीचय करून दिल्यानंतर दुसऱ्या भागात समूहनृत्य झाले. त्यासाठी पार्टीवेयर टॉप ही वेशभूषा होती. हे वेस्टर्न आउटफिट्स मनस्मी यांचे होते. यातून अंतिम फेरीसाठी 10 तरुणींची निवड करण्यात आली. या अंतिम फेरीसाठी लेबल सोनाली सावंत यांची गाऊन डिझाईन ही वेशभूषा होती. प्रशोत्तरानंतर १० जणींतून तिघींची निवड ज्युरींनी केली. या वेळी रीदम डान्स अकादमीच्या कलावंतांनी नृत्य सादर केली. यावेळी या स्पर्धेतून पुढे चमकलेल्यांपैकी मिस स्कुबा इंटरनॅशनल वर्षा राजखोवा, इशा हुबळीकर, स्नेहा भालेराव, श्रावणी पोमण आणि जुई सुहास यांचा सेलिब्रिटी परफॉर्मेंस सादर झाला. चेतन अगरवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. फैशन अँड डांस कोरियोग्राफर, ग्रूमिंग मेंटर, शो डायरेक्टर आणि कॉस्टयूम स्टाइलिस्ट जुई सुहास यांनी सर्व महिला स्पर्धकांची पूर्वतयारी व प्रशिक्षण याचे मार्गदर्शनकरून घेतले होते. सुप्रिया ताम्हाणे यांनी याचे संयोजन केले. ज्वेलरी - बाळासाहेब अमराळे, हेयर एंड मेकअप - आयएसएएस, क्राऊन – गजानन ज्वेलर्स, ऑफिशियल डिझाईनर – धागा हे होते. कोहिनूर ग्रुप याचे मुख्य प्रायोजक आहेत.

याप्रसंगी मीरा कलमाडी, प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, मोहन टिल्लू, संतोष उणेचा, दीपाली पांढरे, संयोगिता कुदळे, तेजश्री अडीगे, संयोजिका सुप्रिया ताम्हाणे आणि शो डायरेक्टर जुई सुहास आदी उपस्थित होते. बॉयज ३ या नव्या मराठी चित्रपटाची टीम यावेळी आवर्जून उपस्थित होती. त्यामध्ये अभिनेते पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे, विदुला चौगुले व दिग्दर्शक विशाल देवरुखकर उपस्थित होते. त्याचा ट्रेलर ही यावेळी दाखवण्यात आला.

Web Title: Pune Festival 2022 Sakshi Miss Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News