

Inauguration of the 38th Pune Festival by Vice President C.P. Radhakrishnan
Sakal
पुणे : ‘‘पुणे ही महापुरुषांची भूमी आहे. पुण्याचे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच स्वातंत्र्य लढ्यातील योगदान उल्लेखनीय आहे. पुणे हे देशातील ज्ञान व विचारांची देवाणघेवाण करणारे महत्त्वाचे शिक्षणकेंद्र असून विविध क्षेत्रातील योगदानामुळे पुण्याने देशाच्या प्रगतीला योगदान दिले आहे. त्याबरोबरच उत्सव आणि सांस्कृतिक वैविध्याची नगरी म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली आहे,’’ असे गौरवोदगार उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.