
PMC Elections
Sakal
पुणे : पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना ही पूर्णपणे भाजपच्या पथ्यावर पडणारी असल्याने आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात न घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अंतिम प्रभागरचना करताना राष्ट्रवादीला पोषक असे काही बदल केले जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र काही किरकोळ बदल केले आहेत; पण यानिमित्ताने भाजपने प्रारूप प्रभागरचनेत झालेल्या चुका अंतिम प्रभागरचना करताना सुधारल्याचेही समोर आले आहे.