
पुणे : ‘फायनान्स’चे ९ लाख असलेली तिजोरी लंपास
कळमनुरी: शहरात एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी नऊ लाख ३९ हजार रुपये व इतर साहित्य असलेली दोन क्विंटल वजनाची तिजोरी पळवली. रविवारी (ता. १०) मध्यरात्री हा प्रकार घडला. शहरातील विकासनगर भागात हैदराबाद येथील स्पंदना स्फूर्ती फायनान्स कंपनीचे कार्यालय असून तळमजल्यावर कार्यालय तर वरच्या मजल्यावर कंपनीचे कर्मचारी राहतात. या कंपनीकडून कर्ज वाटप होते.
कर्ज वसुली रक्कम रोज बँकेत जमा केली जाते. दोन दिवस आलेल्या सुटीमुळे कर्ज वसुली रक्कम कार्यालयातील तिजोरीतच होती. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयाचे कुलूप तोडल्याचे आज सकाळी दिसले. तिजोरीही जागेवर नव्हती. माहिती देताच सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी येथे भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. तिजोरीमध्ये पैशांसह कंपनीचे ६७ हजार रुपयांचे सहा मोबाईल संचही होते. व्यवस्थापक चंद्रकांत विंदाने यांच्या तक्रारीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
Web Title: Pune Finance Rs 9 Lakh Lampas
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..