esakal | पुणे : सदाशिव पेठेत कार्यालयास आग
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे : सदाशिव पेठेत कार्यालयास आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सदाशिव पेठेतील देशमुख वाडी येथे शनिवारी सकाळी सहा वाजता एका कार्यालयास आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये कार्यालयातील सर्व साहित्य जळाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविले.

सदाशिव पेठेतील देशमुख वाडी येथील गुरुचरण अपार्टमेंटच्या छतावर एक खासगी कार्यालय आहे. या कार्यालयास शनिवारी सकाळी 6 वाजता आग लागली. त्याबाबतची माहिती अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर काही मिनीटातच अग्निशामक दलाचा बंब व पाण्याचा टँकर घटनेच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर काही मिनीटातच जवानांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविले. आगीमधे कार्यालयामधील सर्व साहित्य जळाले. दरम्यान, हि आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता अग्निशामक दलाने वर्तविली या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

loading image
go to top