अजित पवारच आमच्याकडे आले होते; सत्तानाट्यानंतर फडणवीसांची पहिली मुलाखत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापनेवेळी आम्ही अजित पवार यांच्याकडे गेलो नव्हतो तर ते स्वतः आमच्याकडे आले होते असा खुलासा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.०७) एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापनेवेळी आम्ही अजित पवार यांच्याकडे गेलो नव्हतो तर ते स्वतः आमच्याकडे आले होते असा खुलासा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.०७) एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तानाट्यानंतर फडणवीस यांनी पहिल्यांदाच सविस्तर मुलाखत दिली. फडणवीस म्हणाले, २३ नोव्हेंबरला जो शपथविधी झाला त्याआधी अजित पवार यांनी आमच्याकडे येऊन सांगितले की, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत मिळून तीन पक्षाचे सरकार जास्त काळ टिकणे शक्य नाही आणि राज्याला स्थिर सरकार देण्याची गरज आहे. ते सरकार फक्त भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास देता येऊ शकते कारण त्यांच्याकडील आमदारांचा आकडा मोठा आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसोबत चर्चा करून दिली असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

नेताजींच्या मृत्यूचे गूढ; जपानमधील अस्थींच्या डीएनए चाचणीची मागणी

तसेच, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील 'मी पुन्हा येईन' ही घोषणा म्हणजे माझा गर्व नव्हता, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला अतिआत्मविश्वास नडला का, या प्रश्नाला उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, 'मी पुन्हा येईन' ही कवितेची साधीशी ओळ आहे. विधानसभेतील भाषणात मी त्याचा उल्लेख केला होता. लोकांना ही ओळ भावली त्यामुळे सर्वत्र पसरली. 'मी पुन्हा येईन'ला कुठेही गर्वाचा दर्प नव्हता. जनतेची सेवा करण्यासाठी 'मी पुन्हा येईन' अशी माझी भावना होती.

भाजपच्या बैठकीला एकनाथ खडसे गैरहजर; पाहा काय म्हणाले

महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर प्रसारमाध्यमांकडून भाजप हरलाय, असे चित्र निर्माण केले जात आहे. आम्ही ७० टक्के मते मिळवली आहेत. जनतेने आम्हाला कौल दिला होता. मात्र, ४४ टक्के मते मिळवणारे एकत्र येऊन संख्याबळात आम्हाला मात दिली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EX CM Devendra Fadnavis First interview after MahaVikasAghadi form Government in maharashtra