सोसायटीच्या पार्किंगमध्ये आग; १३ दुचाकींसह २ रिक्षा खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune Fire news
Pune : सोसायटीच्या पार्किंगमध्ये आग; १३ दुचाकींसह २ रिक्षा खाक

Pune : सोसायटीच्या पार्किंगमध्ये आग; १३ दुचाकींसह २ रिक्षा खाक

खडकवासला : शिवणे येथील एका सोसायटीच्या पार्किंग मधील गाड्या जाळण्याची घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. यात १३ दुचाकी व दोन रिक्षा व एक सायकल जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत पोलीसांच्या माहितीनुसार पाच लाख २३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एकाने घाबरुन पायऱ्यावरून उडी मारल्याने तो जखमी झाला आहे. तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

हेही वाचा: ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना द्या

उत्तमनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य सुरेश कोरडे, (वय २५) व सर्व वाहन चालकांच्या माहिती व फिर्याद दिली आहे. आदित्य कोरडे, बुधवारी रात्री १० वाजता काम्व्रून घरी परतले. पार्किंगमध्ये गाडी लावली. जेवण करून झोपले. गुरुवारी पहाटे पाऊणे सहा वाजता इमारतीत खुप आरडा ओरडा ऐकु आल्याने धावत पार्किंगमध्ये गेले. त्यावेळी पार्किंग उभी केलीली वाहने जळत होती. लोक आग विझविण्याचा प्रयत्न करित होते. सोसायटीतील पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

त्याचे रेकॉडींग तपासले. त्यामध्ये पहाटे साडेपाच ते पाऊणे सहा वाजता एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवर आला. त्याने सोसायटीच्या पार्किंग मधील गाड्यांना आग लावली. तेथुन त्याच्यादुचाकीने तो पळून गेल्याचे दिसत आहे. तसेच या आगीचे घटनेमुळे सोसायटीमध्ये राहणारा मुकेश शैलेन्द्रकुमार (वय ३७ वर्ष) याने घाबरुन पायऱ्यावरून उडी मारल्याने त्याचे दोन्ही पायाला जखम झाली. तो सध्या नवले हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

आगीच्या या घटनेमुळे सोसायटीमध्ये व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीमुळे सोसायटीतील लोकांचे जिवीतास धोका निर्माण झाला आहे. आगीने पाच मजल्यापर्यंत धुराचे लोट पसरल्याने भिंती काळ्या झाल्या आहेत. प्लंबिंग काम जळाले. आगीमुळे महावितरणचे मिटर जळाले. रात्री उशिरापर्यंत मिटर बसविण्याचे काम सुरु होते.

हेही वाचा: ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना द्या

दरम्यान, विविध माहितीच्या आधारे पथके तयार करून तपास सुरु असल्याची माहिती देखील जैतापुरकर यांनी दिली. आगीची माहिती मिळाल्यावर इमारत आणि परिसरातील नागरिकांनी साखळी तयार करून पाणी टाकून आग विझविण्याचे प्रयत्न सूर केले. दरम्यान, नागरिकांनी अग्निशमन दलास माहिती दिली. त्यानुसार, सिंहगड रस्ता, कोथरूड व पीएमआरडीए अशी तिन्ही ठिकाणची यंत्रणा घटनास्थळी पोचली. आम्ही पोचलो त्यावेळी, नागरिकांनी आग विझवत आणली होती. आम्ही उर्वरित आग व कुलिंग करून दिले. असे सिंहगड अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रभाकर उमराठकर यांनी सांगितले. साखळी तयार केली आणि शेजारी इमारती मधील पाणी काढुनी गाड्या विझलेल्या आहेत तसेच तसेच इतरांनी सोसायटीचे विज कलेक्शन बंद केल्या मुळे मोठा अनर्थ टळला आहे.

रिक्षा जळालेल्या मालकाचे नांव सुरेश विठ्ठल कोरडे यांची रिक्षा अंदाजे नुकसान एक लाख रुपये, सुमंत आत्माराम पाटील यांची रिक्षा अंदाजे नुकसान सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर दुचाकी जळालेल्या मालकांची नांवे आकाश भगवानराव जोधळे यांची दुचाकी अंदाजे नुकसान २० हजार रुपये, प्रदीप फेकन ठाकुर अंदाजे नुकसान ३० हजार रुपये, अरुणकुमार श्रीलालबाबु भगत अंदाजे नुकसान ३० हजार रुपये, अरुणकुमार श्रीलालबाबु भगत अंदाजे नुकसान २५ हजार रुपये, अरुणकुमार श्रीलालबाबु भगत अंदाजे नुकसान १० हजार रुपये, आदीत्य सुरेश कोरडे अंदाजे नुकसान ३५ हजार रुपये, |मंगेश राजेंद्र सुर्यवंशी अंदाजे नुकसान २५ हजार रुपये, शंकर परशराम पोफळे अंदाजे नुकसान १५ हजार रुपये, राजेंद्र विशाल शिदे अंदाजे नुकसान १५ हजार रुपये, सचिन चंद्रकांत कंरजवकर अंदाजे नुकसान २५ हजार रुपये, अमित क्रिपालसिंग राठोड अंदाजे नुकसान १० हजार रुपये, शाम रामभाऊ जगताप अंदाजे नुकसान २५ हजार रुपये, संतोष विष्णु सानप अंदाजे नुकसान ३० हजार रुपये, सिध्देश राजेंद्र शिंपी यांची सायकल अंदाजे नुकसान तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी थेट पोलिस आयुक्त

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता घटनास्थळी पोचले. गाडीतून उतरून बाहेरून इमारत पाहिली. थेट पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिल्याने या घटनेमागे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे कायाची चर्चा रंगली आहे. घटनेमागे गुन्हेगारी आहे का, याबाबत परिसरातील प्रत्येक इमारतीत जाऊन पोलिस माहिती घेत आहेत.

परिसरात पेट्रोलची वारंवार चोरी

या परिसरातील अनेक इमारतीत गेट नाही. थेट इमारतीत प्रवेश करता येतो. येथील अनेक वाहनाच्या टाकीतील पेट्रोल चोरीला जात आहे. याबाबत अद्याप कोणी पोलिस तक्रार दिलेली नाही. काही दिवसापूर्वी एका मोटारीतून ३० लिटर पेट्रोल चोरली गेले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top