ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online education
ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना द्या

ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना द्या

नांदेड : राज्यात सध्या शिक्षणापेक्षा दारू दुकाने (Liquor Shop) महत्त्वाची बनली आहेत. कोरोना काळात(Corona virus) ऑनलाइन शिक्षणाद्वारे(online education) बोगस पदवी मिळणार असेल तर त्या ऐवजी मला देशी दारू दुकानाचा परवाना द्यावा, अशी उपरोधिक मागणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलातील विद्यार्थी पवन जगडमवार याने केली आहे. ऑनलाइन शिक्षणात येणाऱ्या अडचणींबाबत त्याने निवेदनाद्वारे त्रागा व्यक्त केला आहे.

हेही वाचा: ST Worker : नागपूर वर्धमान नगर आगारातील २३ कर्मचारी बडतर्फ

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात जगडमवार याने म्हटले आहे, ‘गोरगरीब विद्यार्थ्यांचा कसलाही विचार न करता ऑनलाइन शिक्षण लादले जात आहे. माझ्याकडे चांगला मोबाईल, लॅपटॉप, संगणक आदी साहित्य नसताना मी ऑनलाइन शिक्षण कसे घेऊ? अशीच अवस्था अनेक विद्यार्थ्यांची आहे.

हेही वाचा: शिर्डीत कोविड रुग्णालय सुरू करा : लोखंडे

कोरोना, ओमिक्रॉनचा प्रसार वाढत असल्याने राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. दुसरीकडे बार, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, निवडणुका आदींना परवानगी दिली जाते, पण विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकत नाही. दारूच्या दुकानात गर्दी चालते, पण कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन ऑफलाइन शिक्षण घ्यायला परवानगी नाही. त्यामुळे मलाही देशी दारू दुकानाचा परवाना द्यावा’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top