Pune Fire News: डोंबिवलीनंतर आता पुण्यात अग्नितांडव! महाळुंगे वाकड परिसरात दुकानांना भीषण आग

Pune Fire News: महाळुंगे वाकड दरम्यान मुळा नदीजवळ असलेल्या दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. आग कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Pune Fire News
Pune Fire NewsEsakal

औंध : बेंगळुरू मुंबई महामार्गावर महाळुंगे(पाडाळे) हद्दीत आज गुरुवारी (ता.२३) सायंकाळी तीन दुकाने आगीत जळून कोट्यवधींचे नुकसान झाले. एस.आर.हॅंडिक्राफ्ट ॲंड फर्निचर,आशिष मोटर्स आणि मदिना पिओपी सप्लायर्स हि दुकाने या आगीत जळाली.अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी जवळपास दीड तासाचा कालावधी लागला.

एस.आर.हॅंडिक्राफ्ट ॲंड फर्निचरचे अंदाजे सात हजार स्क्वेअर फूट जागेत दुकान असून टेबल, खुर्च्या, सोफा, बेडसह साहित्य जळून जवळपास सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे योगेश जांगिड या दुकान मालकाने सांगितले. तर मदिना पीओपी सप्लायर्सचे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मालक रिझवान खान यांनी सांगितले.

तर आशिष मोटर्स चारचाकी गाड्यांच्या सर्विस सेंटरमधील गाड्या जळून अंदाजे दिड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मालक सुरेश गाढवे यांनी सांगितले.महाळुंगे ( पाडाळे )येथील वाकडच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यावर दाटीवाटीने हि दुकाने पत्र्याच्या शेडमध्ये सुरू करण्यात आलेली असून फर्निचरच्या दुकानात आग लागली आणि ही आग शेजारच्या दुकानापर्यंत पसरली.

महामार्गाशेजारी मोठ्या प्रमाणावर लागलेली आग बघण्यासाठी महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनीही येथे गर्दी केल्याने आग विझविण्यास अडचण येत होती.आगीच्या ज्वाळांसह धुराचे लोट बाहेर पडत असल्याने आग विझविण्यास अडचण येत होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यावेळी हिंजवडी पोलिसांनी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी महामार्गावर जमा झालेल्या व आग आटोक्यात आणण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या गर्दीला बाजूला हटवले.आग बघण्यासाठी अनेक वाहनचालकांनी रस्त्यावर वाहने लावल्याने मुळा नदीपासून थेट राधा चौकापर्यंत वाहतूकीची कोंडी झाली होती.या कोंडीमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता.

जवळपास एक तासांच्या प्रयत्नानंतर हि आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.तरीही काही काळ हि आग धुमसत होती.हि आग विझवण्यासाठी पीएमआरडीएच्या दोन, पिंपरी चिंचवड मनपाच्या दोन,औद्योगिक विकास महामंडळच्या दोन आणि पुणे महापालिकेच्या पाच गाड्या व दोन वॉटर ब्राउजरनी आग आटोक्यात आणल्याचे अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे यांनी सांगितले.

यावेळी पिंपरी चिंचवडचे सचिन मांडवकर, औद्योगिक विकास महामंडळाचे सचिन नेरकर यांच्यासह तीस जवानांनी हि आग विझविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.यावेळी सहायक पोलिस आयुक्त डॉ.विशाल हिरे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळे, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, उपनिरीक्षक विकास ताकतोडे आदी घटनास्थळी उपस्थित होते.

सुरक्षा यंत्रणेचा अभाव

बावधन ते वाकड दरम्यान महामार्गावर अशा प्रकारची अनेक शेडवजा दुकाने थाटलेली सर्रास दिसून येत आहेत.दुर्देवाने आगीसारखी दुर्घटना घडलीच तर याठिकाणी कुठल्याही सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत.त्यामुळे कामगारांच्या जिविताशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या दुर्देवी घटनेत निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांचाही होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

डोंबिवली हादरली! MIDC मध्ये मोठा स्फोट

डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज दोनमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय. स्फोटामुळे डोंबिवलीकरांमध्ये भितीचे वातावरण आहे. आकाशामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. स्फोटामुळे मोठा हादरा बसला होता. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Pune Fire News
Dombivli MIDC Blast : एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, परिसर हादरला, कित्येक जण जखमी | Video Viral

डोंबिवलीतील एमआयडीसीत केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या भीषण स्फोटाची भीषणता इतकी होती की आसपासच्या २- ३ किलोमीटरपर्यंत इमारतींना हादरे बसले आहेत. परिसरात धुराचे लोट पसरले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीची दाहकता प्रचंड असल्याने आसपासच्या कंपन्यांनाही धोका निर्माण झाला आहे.

Pune Fire News
Dombivli MIDC Blast: डोंबिवली हादरली! MIDC मध्ये मोठा स्फोट, तीन जणांचा होरपळून मृत्यू; ३० ते ४० जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com